📢 गडचिरोली होणार आशियातील सर्वात मोठं स्टील हब - मा. देवेंद्र फडणवीस
स्थानिक

📢 गडचिरोली होणार आशियातील सर्वात मोठं स्टील हब - मा. देवेंद्र फडणवीस

📌 नागपूर येथे आयोजित 'ऍडव्हांटेज विदर्भ 2025' उद्योग महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की गडचिरोली जिल्हा लवकरच आशियातील सर्वात मोठं स्टील हब बनणार आहे.

✔️ गडचिरोलीमध्ये JSW उद्योग समूहासोबत 3 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.

✔️ हा करार जिल्ह्याला औद्योगिक क्रांतीच्या दिशेने नेईल.

💼 सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड गडचिरोलीत 10,000 कोटी रुपये गुंतवणूक करून एक एकत्रित स्टील प्रकल्प उभारणार आहे.

✔️ प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 80 लाख टन स्टील उत्पादन अपेक्षित आहे.

✔️ 20,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

📌 फडणवीस यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत गडचिरोली भारताच्या एकूण स्टील उत्पादनात 30% योगदान देईल.

✔️ या प्रकल्पांमध्ये 80% रोजगार स्थानिक नागरिकांनाच दिला जाणार आहे.

🛣️ गडचिरोलीला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

🛡️ मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी नक्षलग्रस्त असलेला गडचिरोली आता विकासाच्या मार्गावर आहे आणि ३ वर्षांत पूर्णपणे नक्षलमुक्त होईल.

🌟 या सर्व प्रकल्पांमुळे गडचिरोली महाराष्ट्र आणि भारताचं एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

🕒 पोस्ट केलेली तारीख :